मिशन मंगल चित्रपट ..शास्त्रज्ञांचा रोमहर्षक प्रवास

(हर्षल आल्पे)

एमपीसीन्यूज- स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या भारत देशाने अंतराळ क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे … अत्यंत प्रतिकुल स्थितीत आपल्या शास्त्रज्ञांनी आपल्या देशाचे नाव कधी खाली पडू दिलेली नाही…आणि अजुनही हा त्यांचा प्रवास चालु आहे.

आपल्यासारख्या सामान्य माणसाला उपग्रह पाठवण्याची प्रक्रिया विस्तृतपणे माहीत नसते. ती प्रक्रियाच या चित्रपटात अत्यंत सोप्या शब्दात जगन शक्ती आणि त्यांच्या टीम ने सहजगत्या मांडली आहे. त्याला उत्तम साथ कलाकारांनी दिली आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा, संजय कपुर, शर्मन जोशी, विक्रम गोखले, किर्ती कुल्हारी या सर्वच नामवंत कलाकारांची कामे सुरेख झाली आहेत. .चित्रपटाचे संगीत अमित त्रिवेदी आणि तनिष बक्ची यांनी उत्तम सांभाळले आहे..

शास्त्रज्ञांचे माणुसपण यात खर्‍या अर्थाने दाखवले आहे. शास्त्र हे विविधतेने नटलेले असते फक्त ते डोळसपणे अनुभवण्याची आणि होकारात्मकतेने त्याच्याकडे पाहाण्याची गरज आहे. हाच चित्रकर्त्यांचा खरा हेतु असावा हे जाणवतं.

आपले शास्त्रज्ञ एखादा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी आणि आपल्या देशाच नाव मोठ करण्यासाठी जीवाचं रान करत असतात .. त्यांच्या अपरिचित कार्याचा गौरव करण्यासाठी आणि अपयशाने खचुन न जाता सतत नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन कार्यमग्न होण्याची प्रेरणा घेण्यासाठी एकदा तरी हा चित्रपट पाहावाच असा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.