-MPC-TOP-MOST-BANNER-I

‘द ताश्कंद फाईल्स’ ढवळून टाकणारे वास्तव

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- काही चित्रपट असे असतात की ते पाहिल्यावर तुम्ही इतिहासातल्या, स्वतःच्या जाणिवांमध्ये मग्न होऊन जाता. अन शोधायला लागता स्वतःचे नसलेले, असलेले अस्तित्व. पुन्हा एकदा सगळ्याच गोष्टींची तुम्ही चाचपणी करून बघता. आजवर मी शिकला तो इतिहास खरा की अचानक समोर आलेले हे वास्तवरुपी जंजाळ खरे ? हे समजेनासे होते. हे जंजाळ तुम्हाला स्वतःचे खुजेपण स्वच्छ आरशासारखे दाखवते. तुमच ते रूप पाहून तुम्ही रडवेले होता कि असा होता माझा इतिहास ? आणि मी असा आहे ? त्यानंतर मग तर हाती काहीच उरत नाही. खूप गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही धावायला लागता अधाशा सारखे. असाच अस्वस्थ करणारा चित्रपट आहे ‘द ताश्कंद फाईल्स’.

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री एक युध्द जिंकून ताश्कंदला करारासाठी जातात काय ? तो करार झाल्यावर अचानक त्या रूममध्ये जाऊन कायमचे आपल्यातून निघून जातात काय ? सगळेच अकल्पित आणि अनाकलनीय ! हलवून टाकणारी ही घटना आणि त्यानंतर त्याच्यावर आपणच टाकलेला पडदा, दाबून टाकलेले ते सगळे नको असलेले प्रश्न. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा आपल्यासमोर आल्यावर मात्र आपण अवाक होतो.

खरतर या सगळ्याबद्दल अत्यंत जुजबी माहिती आपल्याला असते. एकूणच आपण इतिहासाबद्दल उदासीन आहोत हे जाणवत राहत. विवेक अग्निहोत्री या लेखक दिग्दर्शकाने अत्यंत त्रयस्थपणे हा सगळं इतिहास आपल्या चित्रपटामधून मांडला आहे. हा सिनेमा तयार करताना दिग्दर्शकाने लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल आणि एकूणच त्याच्या इतिहासाबद्दल इतकी खोलवर माहिती जमवली आहे की, ती ती माहिती वाचली तरी आपण दमून गेलो असतो

या सर्व माहितीवर चित्रपट काढायचा तर तो माहितीपट होता कामा नये, एक कलाकृती म्हणून प्रेक्षकांच्या मनाला भिडला पाहिजे हे खायचे काम नाही. चित्रपट माध्यमाचे, इतिहासाचे आणि त्याचबरोबर वास्तवाचे भान राखून सिनेमा तयार करणे ही तारेवरची कसरत होती. विवेक अग्निहोत्री यांनी कुठेही तोल ढळू न देता कलाकृती तयार केली आहे. असे चित्रपट एककल्ली होण्याची भीती असते. पण हा चित्रपट कुठल्याही फ्रेममध्ये एककल्ली झालेला वाटत नाही . हा चित्रपट कुठेही झुकलेला वाटत नाही.

प्रत्येक कलाकाराने यामधील भूमिका समरसून केल्या आहेत. विशेष लक्षणीय म्हणजे विरोधी पक्षाचा नेता आणि कमिटीचा प्रमुख म्हणून मिथुन चक्रवर्ती याने आपल्या अभिनयामधून ती व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. फारच सूक्ष्म आणि सहज वावर यामुळे तो आपल्या मनात घर करून जातो. श्वेता बसू हिने साकारलेली पत्रकार आजवर फारच कमी वेळा आपल्याला पाहिला मिळाली आहे. तिने उचारलेला प्रत्येक शब्द हा लिखित नसून, ते शब्द ती काही काळ का होईना जगलीये असेच वाटत राहते.

नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेला मंत्री आपल्याला राग आणतो. एकूणच व्यवस्थेवर आणि त्यातल्या उगाच खेळ करणाऱ्या त्या मुरब्बी राजकारण्याचा आपल्याला तिरस्कार वाटतो. पल्लवी जोशीने साकारलेली हट्टी इतिहासकार, मी म्हणेन तेच सत्य याचा अट्टहास करणारी व्यक्ती पाहून आपल्याला प्रश्न पडतो की अशी व्यक्ती सुद्धा असू असते. ती सुद्धा शेवटी सत्यापुढे असहाय्य्य होते तेव्हा आपल्याला मनोमन हायसे वाटते.

हा सिनेमा पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपण शाळेमध्ये शिकलेला इतिहास किती खुजा होता हीच जाणीव होत राहते. इतिहास सांगण्यापेक्षा तो दडवण्यातच आपण आजवर धन्यता मानली आहे. पण येणारी नवीन पिढी मात्र आज शिकवलेला गाळीव इतिहास पुसून नव्याने लिहून त्या इतिहासातल्या प्रश्नांवर नवीन धक्कादायक आणि तरीही सत्य अशी उत्तर शोधेल सुद्धा. त्यावेळी कदाचित तो इतिहास लपवण्याची ताकद त्या इतिहासामध्ये नसेल. कारण इंटरनेटच्या या महाजालात तयार झालेली पिढी यांना जग फक्त एका बोटावर उपलब्ध आहे. हेच हा चित्रपट आपल्याला दाखवतो आणि आपण शून्यात निघून जातो .

अस करेल अस कोणीच सांगू शकत नाही , त्यांची उत्सुकता ,त्यांच विद्रोही पण ,कदाचित ,त्यावेळी कदाचित तो इतिहास लपवण्याची ताकद कदाचित त्या इतिहासामध्ये ही नसेल ,कारण इंटरनेट च्या या महाजालात तयार झालेली पिढी ,याना जग फक्त एका बोटावर उपलब्ध आहे .हेच हा चित्रपट आपल्याला दाखवतो आणि आपण शून्यात निघून जातो. शेवटी मानसिक गुलामगिरी ही कधी न कधी शेवटाकडे घेऊन जाणारच. सत्य हे सत्य असते तुम्ही किती ही दडवले तरी ते कधीतरी आपले अस्तित्व दाखवतेच या चित्रपटाने ते आज दाखवलय …. अगदी अलिप्तपणे

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn