Filmfare Award : शुभंकर तावडेला ‘कागर’ साठी बेस्ट डेब्यु फिल्मफेअर पुरस्कार

एमपीसी न्यूज – ‘कागर’ चित्रपटाव्दारे मराठी सिनेसृष्टीत अभिनयाची सुरूवात करणा-या अभिनेता शुभंकर तावडेला या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यु फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. कागर सिनेमातील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

पहिला-वहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने भारावलेला शुभंकर तावडे प्रतिक्रिया देताना म्हणाला, फिल्मफेअर पुरस्काराची ‘ब्लॅक लेडी’ मिळवणं हे खुपच अभिमानाचं आणि स्वप्नवत आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या प्रत्येक अभिनेत्याचे हे स्वप्न असतं. आज हे स्वप्न सत्यात उतरताना अतिशय आनंद होतोय.

शुभंकर पूढे म्हणतो, मला कागरचे दिग्दर्शक मकरंद माने ह्यांचे खूप आभार मानावेसे वाटत आहेत. कारण माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्यामध्ये त्यांनी कागरमधला हिरो पाहिला. मी सिनेमातला हिरो बनू शकतो, हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. माझ्या वडिलांचे (अभिनेता सुनील तावडे) मार्गदर्शनही मला सातत्याने मिळत गेल्याने मी आजवर इथवर पोहोचलो. पुरस्कारासाठी त्याने प्रेक्षकांचेही आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.