Pune : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनो वसतीगृहाचा ताबा सोडा; पुणे विद्यापीठाची विद्यार्थ्यांना नोटीस

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना एक नोटीस जाहीर केली आहे. अंतिम वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले असून त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहातील खोलीचा ताबा सोडावा, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आहेत. तसेच निकाल देखील जाहीर झाला आहे. तरीही काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृह खोल्यांचा ताबा सोडलेला नाही. विद्यार्थ्यांनी खोल्यांचा ताबा सोडण्याबाबत विद्यापीठाने वारंवार सूचना दिल्या आहेत. तरी देखील विद्यार्थ्यांनी वसतिगृह खोलीचा ताबा वसतिगृह कार्यालयाकडे सुपूर्त केलेला नाही.

यामुळे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील वसतिगृह प्रवेशाचे नियोजन करणे तसेच वसतिगृह देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यास विद्यापीठ प्रशासनाला गैरसोयीचे होत आहे. 23 ऑक्टोबर 2021 पर्यंत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी वसतिगृह खोलीचा ताबा वसतिगृह कार्यालयाकडे सुपूर्त करावा, असे न केल्यास खोलीचा ताबा वसतिगृह कार्यालयाकडे घेण्यात येणार आहे.

खोल्यांमधील सामान वसतिगृहाच्या सामान कक्षात ठेवण्यात येणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची असेल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.