Crime News : अखेर सेक्स तंत्रा फाऊंडेशनच्या मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अश्लिल फोटोंचा वापर करून सर्वत्र जाहिरात प्रदर्शित करणाऱ्या सेक्स तंत्रा सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनच्या मालकावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही जाहिरात समाज माध्यमांवर झळकल्यानंतर सर्वच स्तरातून होणारा विरोध पाहता पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रवि प्रकाश सिंग (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने सायबर गुन्ह्यांअतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधीत आरोपीने सेक्स तंत्रा नावाचा कोर्स खास नवरात्रीमध्ये दोन दिवसांसाठी आयोजीत केला होता. हा कोर्स पुण्यातील कॅम्प परिसरात आयोजीत केला होता. ज्याची एका व्यक्तीस 15 हजार रुपये होती.ही जाहिरात वाऱ्याच्या वेगाने समाज माध्यमांवर पसरली व सर्वच स्तरातून या कोर्सला विरोध दर्शविण्यात आला.या जाहिरातीत ही अश्लील फोटोंचा वापर करण्यात आला होता.

पोलिसांतही याबाबत तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी जाहिरीवरील क्रमांवर फोन लावाला असता तो बंद आला,पुन्हा पोलिसांनी व्हॉटसअपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पुढील व्यक्तीने रवि सिंग असे स्वतःचे नाव असून हा क्रमांक त्याचाच असल्याचे सांगितले.सिंग हा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून त्यानेच ही जाहिरात बनवली असल्याची खात्री झाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस अमंलदार मनिषा पुकाळे यांनी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.