Pune : सुनेने मारहाण केलेल्या ‘त्या’ सासूचा अखेर मृत्यू

एमपीसी न्यूज – निवांतपणा मिळत नसल्याच्या कारणावरून सुनेने झोपेच्या गोळ्या देऊन मारहाण केलेल्या सासूचा उपचारदरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी सुनेसह तिच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना 30 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

आफरीन इरफान शेख (रा.निम्रा टॉवर, कोंढवा) आणि आसिफ हुसेन शेख (वय-20, रा.कासेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. फरझान अशपक शेख (वय-45) असे मृत्युमुखी पडलेल्या सासूचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झाल्याचे सांगून सासूला सुनेने तिच्या मित्राच्या मदतीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांना संशय आल्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सून, तिची बहिण आणि मित्राला पोलीसी खाक्या दाखवताच हा कट उघड़कीस आला.

मयत फरजाना शेख यांच्या मुलाचे सहा महिण्यापुर्वीच लग्न झाले होते. घरातील कामावरून सासू-सुनात नेहमी वाद होत असे. मुलगा दुपारी कामावर गेल्यानंतर सासु-सुना दोघीच घरात असायच्या. सासू नेहमी हात धुवून मागे लागते आणि तिच्यामुळे आपल्याला निवांतपणा मिळत नाही, याकारणावरून सुनेने सासूचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी तिने बहिण आणि मित्राची मदत घेतली. आणि सोमवारी (30 जुलै) सुनेने दुपारच्या सुमारास सासूला पिण्यासाठी सुप करून दिले. त्यात तीने गुंगीचे औषध मिसळल्याने काही वेळातच सासू बेशुध्द पडली. त्यानंतर तिला बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने फरझान यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.