Pune : उच्चांकांच्या ‘हॅटट्रीक’नंतर अखेर घसरला तापमापकातील पारा! कमाल तापमान 40.2 अंशांवर! 

एमपीसी न्यूज – उष्णतेच्या लाटेमध्ये गेले तीन दिवस सलग नवनवीन उच्चांक नोंदविणारे तापमान अखेर आज घसरले. 43 अंश सेल्सियसवरून पारा एकदम 2.8 अंशांनी खाली उतरला आणि पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला, पुण्यात आज 40.2 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदविले गेले. 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात तापमापकातील पाऱ्याने काल 43 अंश सेल्सियसचा टप्पा गाठत 52 वर्षांपूर्वीच्या तापमानाची बरोबरी केली होती. पुण्यातील आतापर्यंतच्या सर्वांत उष्ण दिवसांपैकी हा सहावा दिवस काल नोंदविला गेला. सर्वोच्च तापमानांपैकी हे तिसऱ्या क्रमांकाचे तापमान होते. त्यापूर्वी तीन दिवसांत तापमापकातील पारा 42 अंशाच्या वर राहिला आणि तिन्ही दिवस आणखी वर जात आज 43 अंशांचा टप्पा गाठला गेला होता. तापमान आणखी वाढण्याच्या भीतीने पुणेकर चिंताग्रस्त असतानाच वेधशाळेचा अंदाज खरा ठरवत तापमानाच्या आलेख खालच्या दिशेने वळला. कमाल तापमानात एकदम 2.8 अंशांनी घट झाली. त्यामुळे आज उकाडा मागील तीन दिवसांच्या तुलनेत सुसह्य वाटला.

पुण्यातील आतापर्यंतचे ‘हॉटेस्ट डे’

43.3 = 30 एप्रिल 1897
43.3 =  7 मे 1889
43.2 = 24 एप्रिल 1958
43.2 =  8 मे 1960
43.0 = 10 मे 1967
43.0 = 28 एप्रिल 2019
(साभार – भारतीय हवामानशास्त्र विभाग)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.