T20 World Cup Postponed: अखेर T20 विश्वचषक आयोजन पुढे ढकलले

Finally the T20 World Cup has been postponed 2021 साली होणारा T20 विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल असंही आयसीसीने जाहीर केलं आहे.

एमपीसी न्यूज – ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाचं आयोजन अखेरीस पुढे ढकलण्यात आलेलं आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीने याबद्दल सोमवारी अधिकृत घोषणा केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसी विचार करत होते. परंतु, यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

T20 विश्वचषकाचं आयोजन 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात करण्यात आलं होतं. परंतु, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन केला.

मध्यंतरीच्या काळात ऑस्ट्रेलियन सरकारने नियमांमध्ये शिथीलता आणली होती. परंतु, रुग्णांची संख्या वाढताच सरकारने परत लॉकडाऊन घोषित केलं आहे.

देशातील एकंदर परिस्थिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियावरचं आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं जाणं ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती.

दरम्यान, 2021 साली होणारा T20 विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल असंही आयसीसीने जाहीर केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.