Pune News : चंद्रकांत पाटलांकडून खून झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

आरोपीला शासन होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन

एमपीसी न्यूज : पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडले होते. आज या घटनेतील मयत मुलीच्या कुटुबियांची भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी मुलीच्या दिव्यांग भावाला आपले दुःख व्यक्त करताना अतिशय वेदना होत होत्या. तरीही तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा व्हावी, अशी आर्ततेने मागणी करत होता. यावेळी पाटील यांनी कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) हिचा एकतर्फी प्रेमातून निर्घृण खून झाला होता. ही तरुणी कबड्डीचा सराव करण्यासाठी मैदानावर गेली असता आरोपीने कोयत्याने सपासप वार करून तिचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर बिबवेवाडी पोलीसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.