Maharashtra News : बीएचआर घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी

एमपीसी न्यूज : मल्टी-स्टेट  बी.एच.आर. (भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था) संचालकाच्या जळगावासह औरंगाबादमधील घरी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौकशीचे कामकाज सुरू होते. बी. एच. आर. पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी आर्थिंक गुन्हे शाखेने कारवाईच्या निमत्ताने कंबर कसली आहे. 

ठेवीदारांच्या ठेवी माघारी न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलीसांच्या तीन पथकाकडून जळगाव आणि औरंगाबादमध्ये छापेमारी केली आहे. याप्रकरणी पुणे, पिंपरी आणि ग्रामीणला प्रत्येकी एक मिळून तीन गुन्हे दाखल आहेत. बी. एच. आर. पथसंस्थेचे जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील शिवाजीनगरमधील घरी सकाळीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकल्याने खळबळ उडाली होती. पतसंस्थेच्या कार्यालयास इतर शहरातील काही ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशी सुरू केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, बीएचआर पंतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी जळगाव आणि औरंगाबादमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकले आहेत. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.