Pune News : रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून घरकाम करणाऱ्या दाम्पत्याची आर्थिक फसवणूक

  रेल्वे खात्यातील इंजिनियरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : घर काम करणाऱ्या दाम्पत्याला रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्या जवळून दीड लाख रुपये उकळले. त्यानंतर नोकरी न लावता फसवणूक केली. इतकेच नाही तर नोकरी विषयी विचारले असता महिलेचा विनयभंग केला तर या दाम्पत्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. 

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून इंजिनिअर विजयसिंग शहाजी दडस (वय 40) याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग, फसवणूक आणि अनुसूचित जातीजमती अधिनीयम या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी विजय सिंग दडस हे रेल्वे खात्यात नोकरीला आहेत. पुण्यातील संगम पार्क येथील रेल्वे वसाहत येथे ते राहतात. तर फिर्यादी आणि त्यांचे पती  2019 पासून त्यांच्याकडे घर काम करतात. तर त्यांच्या निवासस्थानी असलेल्या आऊट हाऊस मध्ये ते राहतात

विजयसिंह दडस यांनी फिर्यादी महिला आणि तिच्या पतीला रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्यांनी वेळोवेळी दीड लाख रुपये देखील घेतले होते. परंतु नोकरी लावली नाही. याविषयी फिर्यादी महिलेने विचारणा केली असता त्यांना जातिवाचक शिवीगाळ आणि विनयभंग केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.