India Corona Update : दहा मुद्यांमध्ये जाणून घ्या देशातील कोरोना व ओमायक्रॉनची सद्यस्थिती

एमपीसी न्यूज – भारतात सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या 10 हजारांहून अधिक झाली आहे. 

1. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 37 हजार 704 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आहे. शुक्रवारपेक्षा 9,550 रुग्ण कमी झाले आहेत.

2. देशात सध्या 21.13 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3. भारताचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 17.22 टक्क्यांवर पोहोचला आहे.

4. देशात आतापर्यंत 10,050 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत काल पेक्षा 3.69 टक्के अधिक ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.

5. गेल्या 24 तासांत देशभरात 488 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

6. चोवीस तासांत 2 लाख 42 हजार 676 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 93.31 टक्के एवढा आहे.

7. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 71.34 टक्के प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 19.60 लाख चाचण्या पार पडल्या.

8. देशात सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवार, शुक्रवारी देखील तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले होते.

9. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

10. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 161.16 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.