India Corona Update : देशातील कोरोना, ओमायक्रॉनची सद्यस्थिती जाणून घ्या दहा मुद्यांमध्ये  

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू झाली आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद देशात होत असून, ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशातील कोरोना व ओमायक्रॉनची सद्यस्थिती जाणून घेऊया दहा मुद्यांमध्ये. 

1. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 89 हजार 970 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद असून, 1 लाख 88 हजार 157 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

2. देशात सध्या 18.35 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3. भारताचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 14.43 टक्क्यांवरुन 15.13 टक्क्यांवर पोहोचला आहे.

4. देशात आतापर्यंत 8,961 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत काल पेक्षा 0.79 टक्के अधिक ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.

5. गेल्या 24 तासांत देशभरात 441 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

6. देशाचा रिकव्हरी रेट 93.88 टक्के एवढा आहे.

7. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 70.74 टक्के प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 18.69 लाख चाचण्या पार पडल्या.

8. गेल्या एका आठवड्यात देशात 17 लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पण, रुग्णालयात दाखल होण्याचा दर अत्यंत कमी आहे.

9. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

10. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 158.96 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.