Diwali 2020 News : जाणून घ्या यंदाचे दीपावली मुहूर्त

दिपावली मुहूर्त 2020

धनत्रयोदशी : अश्‍विन कृष्ण 13, शुक्रवार 13नोव्हेंबर 2020.

‘प्रदोष’ – व्यापारी वही खरेदीसाठी मुहूर्त
सकाळी 8.00 मि. ते सकाळी 11.00 पर्यंत लाभ/अमृत
सायंकाळी 5.00 मि.ते दुपारी 06.30 चंचल
सायंकाळी 5.00 ते 06.30 ह्या वेेळेत सुवर्ण अलंकाराचे पुजन करावे.

यमदीपदान : अश्‍विन कृष्ण 13, शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020

या दिवशी सायंकाळी कणिकेचा दिवा करून घराच्या दक्षिण दिशेला ज्योती करून लावून ठेवावा. दिव्याची पुजा करावी व पुढील श्‍लोक म्हणून दक्षिणेला तोंड करून यमदेवतेला नमस्कार करावा. त्यामुळे अपमृत्यू टळतो.

मृत्युनां पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह
त्रयोदश्यां दीपदप्नात सुर्यजः प्रतितां मम

नरक चतुर्दशी – अभ्यंगस्नान : अश्‍विन कृष्ण 14, शनिवार14 नोव्हेंबर 2020.

चंद्रोदयी पहाटे 5 वाजून 31 मिनीटे.
चंद्रोदयीच्या वेळी पहाटे सुगंधी तेल व उटणे अंगाला लावून अभ्यंग स्नान करावे. पिता असणाऱ्या व्यक्तींनी पाण्यात अक्षता टाकून स्नान करावे व इतरांनी पाण्यात तिळ टाकून स्नान करावे. स्नानानंतर दक्षिणेकडे तोंड करून यमदेवतेला पुढील चौदा (14) नावांनी अर्ध्य द्यावे.

1.यमाम नमः यमं तर्पयामि, 2. धर्मराजाय नमः धर्मराजं तर्पयामि, 3. मृत्यवे नमः मृत्यूं तर्पयामि, 4. अन्तकाय नमः अन्तकं तर्पयामि, 5.वैवस्वताय नमः वैवस्वतं तर्पयामि, 6. कालाय नमः कालं तर्पयामि, 7. सर्वभुतक्षयाय नम : सर्वभुतक्षयं तर्पयामि, 8. औदुंबराय नम : औदुंबर तर्पयामि, 9.दघ्नाय नम : दघ्नं तर्पयामि, 10.नीलाय नमः नीलं तर्पयामि, 11.परमेष्ठिनेे नम :परमेष्ठिनं तर्पयामि, 12. वृकोदराय नमः वृकोदरं तर्पयामि, 13. चित्राय नमःचित्रं तर्पयामि, 14.चित्र गुप्ताय नम : चित्र गुप्तं तर्पयामि,.

नंतर दक्षिणकडे तोंड करून पुढील श्‍लोक दहा वेळा म्हणावा.त्यामुळे आयुष्यवृद्धी होते.
यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्‍च काल : भूताधिपोदत्त कृतानुसारी कृतांत एतत्त्शिर्भिंर्जपती ॥

लक्ष्मी कुबेर पुजन ( दिपावली) : अश्‍विन कृष्ण 30 ़शनिवार14 नोव्हेंबर 2020.

” दुपारी 2 : 00 ते सायंकाळी 5 : 00, सायंकाळी 6.30 ते रात्री 8.00 पर्यंत, रात्री 9.30 ते 12.30 पर्यंत शुभदायक कालावधी राहील.

मुहूर्त रात्री 6ः30 ते 8ः00 ही उत्तम मुहूर्त (वृषभ लग्न ). या दिवशी दीपपुजा व दीपदान केल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते.

” अन्नकूट गोवर्धन पुजन : अश्‍विन 30 स10.37पर्यंत, नंतर(1)रविवार 15 नोव्हेंबर 2020.

_MPC_DIR_MPU_II

विविध मिठाई व भाजीपाला व पुरीचा नैवदय दाखवण्याची पध्दत आहे. गायीची पुजा करून अन्नकुटाचा नैवदय करून देवाला अर्पण केला जातो. कार्तिक शुक्ल 1 सोमवार : दिनांक 16नोव्हेंबर 2020.

  बलिप्रतिपदा, वहीपूजन, दिपाावली पाडवा, पतीस ओवाळणे.

वही पुजनाचा मुहुर्त : 1) पहाटे2.00 ते 3.35 पर्यंत. 2) पहाटे 5.15 ते सकाळी 8.00 पर्यंत. 3) सकाळी 9.30 ते 11.00 पर्यंत व या मुहुर्तावर पाटावर बलीची प्रतिमा तांदुळाने काढून त्यांची पुजा करावी. जमाखर्चाच्या नवीन खरेदी केलेल्या वह्यांची पुजा करून लिखाणास सुरूवात करावी.

या दिवशी पहाटे स्त्रियांनी पतीला अभ्यंगस्नान घालून ओवाळावे व मिष्ठान्नाचे भोजन करावे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानानंतर नरक चतुर्दशीला सांगितल्याप्रमाणे चित्रगुप्त व यमदुतसह यमदेवतेचे तर्पण करावे. यामुळे आयुष्यवृद्धी होते.

यमद्वितीया /भाऊबीज : कार्तिक 02, सकाळी 7.07 नंतर सोमवार दिनांक : 16 नोव्हेंबर 2020.

या दिवशी बहिणीकडून अभ्यंगस्नान करावे व बहिणीला भेटवस्तू द्यावी.

 तुलसी विवाह : 26 नोव्हेंबर ते 30 नोव्होंबर 2020.

या काळात सुर्यास्ताच्या वेळी तुलसीचा श्रीकृष्णा बरोबर विवाह लावण्याची पद्धत आहे.

 वैकुंठ चतुर्दशी : रविवार, दिनांक 29 नोव्होंबर 2020.

या रात्री आवळीच्या झाडाखाली श्री विष्णुचे सहस्त्र तुलसीपत्राने पुजन करावे व पहाटे सुर्योदयाच्या वेळी सहस्त्र बिल्वपत्राने श्री शिवाचे पुजन करावे.

 त्रिपुरारी पौर्णिमा : कार्तिक 15, रविवार दिनांक 29 नोव्होंबर 2020.

सायंकाळी सुर्यास्तानंतर 750 त्रिपुर वाती आवळयावर लावाव्यात. या दिवशी त्रिपुरासराचा वध झाला म्हणून वाती लावून दिपोत्त्सव साजरा करतात.

कार्तिक स्वामी दर्शन पुजन : रविवार दिनांक 29 नोव्होंबर 2020दुपारी 12.48 मि. नंतर संपूर्ण दिवस व 30 नोव्हेंबर 2020 पहाटे 6.00 पर्यंत.

कृत्तिका नक्षत्र असल्याने या योगावर कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे. प्रथम स्नान करून कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन दर्भ, चंदन, फुले, दशांगधुप, दीप, अर्पन करून कार्तिक यांचे वाहन मयूर यांची पुजा करावी. वर्षातील या एकाच दिवशी स्त्रियांना कार्तिक स्वामीचेदर्शन घेता येते. या दिवशी कार्तिक स्वामीची विधीवत पुजा केल्याने कुबेरासारखी संपत्ती मिळते.

इति
॥ शुभं भवतु .॥
ज्योतिष भास्कर : उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)
मो.नं.9922311104, 8446911104.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.