Technology News : गुगल मॅपवर पत्ता शोधा आता मराठीत

एमपीसी न्यूज : गुगल मॅप सध्या फक्त इंग्रजीत असल्यामुळे ज्यांना इंग्रजी येत नाही अशा लोकांना याचा वापर करण्यात अडचणी येतात. मात्र आता ही समस्या दूर होणार असून चक्क मराठीत आता तुम्हाला एखाद्या ठिकाणचा पत्ता शोधता येणार आहे.

गुगल मॅपने दहा हिंदुस्थानी भाषांसाठी ऑटोमॅटिक ट्रांसलिट्रेशन सिस्टिम सुरू केली आहे. यात मराठीसह हिंदी, गुजराती, कन्नड, बांग्ला, मल्याळम, पंजाबी, उडिया, तमीळ आणि तेलुगू आदी भाषांचा समावेश आहे. ट्रांसलिट्रेशनमुळे एखाद्या ठिकाणचा पत्ता स्थानिक भाषेमध्ये शोधता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.