Hinjawadi : बनावट कागदपत्रे सादर करून जागा बळकावण्याचा प्रयत्न करणा-या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून त्याआधारे जागा बळकावण्याचा प्रयत्न करणा-या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 सप्टेंबर 2019 पूर्वी बाणेर येथे घडला. तक्रार अर्जावरून याबाबत 27 ऑक्टोबर 2020 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफजल नूर मोहम्मद खान (वय 44), इरफान शफीउद्दीन कालेमुंडासे (दोघे रा. फेमस चौक, नवी सांगवी), नसरुद्दिन शमशुद्दीन शेख (रा. औंध), युसुफ रहीम शेख उर्फ बाबा शेख (रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विजय शेशमल पोरवाल (वय 61, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या बाणेर येथील जागेचे फिर्यादी यांच्या वडिलांच्या नावाने 20 रुपयांच्या स्टॅंपपेपर 1989 साली बनावट ताबे साठेखत बनवले. त्यावर फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या बनवत सह्या करून ते कागदपत्र खरे असल्याचे भासवून पोलिसांना व न्यायालयात सादर केले. फिर्यादी यांच्या जागेचे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून फिर्यादी यांची फसवणूक करून त्यांच्या जागेवर अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होत. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.