Chikhali: होमगार्डवरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

FIR file against five who attack on homeguard at chikhali pimpri chinchwad

एमपीसी न्यूज: गोंधळ घालणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या होमगार्डला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) चिंचवड येथील शिवतेज नगर येथे घडली होती.

सागर लहू चिपाडे, ओंकार शेळके, आकाश शेळके, राहुल स्वामी, शुभम डीकळे (सर्व रा. घरकुल, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीदाराम इंदाजी चौधरी (वय 50, रा. शिवतेज नगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीदाराम यांचे शिवतेज नगर येथे उर्मिला व्हरायटी नावाचे दुकान आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास दीदाराम आणि त्यांची मुलगी उर्मिला हे दोघेजण दुकानात बसले होते. त्यावेळी संशयित आरोपी दुकानात आले. दुकानात आरोपी सिगारेट पीत होते. त्यामुळे दीदाराम यांनी आरोपींना सिगारेट बाहेर पिऊन दुकानात या, असे सांगितले.

यावरून आरोपींनी दीदाराम, त्यांची मुलगी उर्मिला यांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर दीदाराम यांची दुकानाच्या बाहेर लावलेली मोपेड दुचाकी खाली पाडली. याबाबत विचारणा करणाऱ्या दीदाराम यांना त्या तरुणांनी मारहाण केली.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेत कार्यरत असलेले होमगार्ड साळुंखे रस्त्याने जात होते. दुकानासमोर सुरू असलेला गोंधळ पाहून ते दुकानाजवळ आले. त्यांनी त्या तरुणांना गोंधळ घालू नका म्हणून सांगितले. त्यावरून त्या तरुणांनी होमगार्ड साळुंखे यांनाही बेदम मारहाण केली. संशयित आरोपींपैकी सागर चिपाडे याने पुपाराम चौधरी यांच्या डोक्याला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करुन जखमी केले आहे. याप्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like