Bhosari Fire News : भोसरीत केबलच्या सर्व्हररुमला आग ; जिवितहानी नाही 

एमपीसी न्यूज – लांडेवाडी, भोसरी याठिकाणी केबलच्या सर्व्हररुमला आज (शनिवार, दि. 20) पहाटे साडेसहाच्या सुमारास आग लागली. भोसरी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

भोसरी अग्निशमन दलाचे विकास नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास नगर, लांडेवाडी याठिकाणी पहाटे साडेसहाच्या सुमारास केबलच्या सर्व्हररुमला आग लागली. याठिकाणी बॅटरी चार्जिंगला लावल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

भोसरी अग्निशमन दलाचे एक गाडी घटनास्थळी दाखल झाली व दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भोसरी अग्निशमन दलाचे विकास नाईक, बबुशा गवारे, राजाराम लांडगे व अनिल यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.