Wakad News : गादीच्या दुकानाला मोठी आग, तीन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज – वाकड येथील भुजबळ चौकाजवळील गादीच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत दुकान पूर्णतः जळाले असून आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील पसरली आहे. यामध्ये तीन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. त्यापैकी एक दुकान फटाक्याचे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले व आगीचे लोट हवेत पसरले. आज (दि.30, मंगळवारी) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही आग लागली.

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही तसेच या घटनेतील जखमींबद्दल देखील अद्याप माहिती मिळू शकली नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 6.23 वाजता पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला वाकड चौक, पंढरी मंगल कार्यालयाजवळ एका दुकानाला आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, भोसरी, रहाटणी उपकेंद्र, हिंजवडी, पीएमआरडीए येथील पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरू आहे.

असा हा अग्नीतांडव –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.