BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बिबवेवाडीत आगीत 7 कुटुंबांची घरे जळून खाक

0

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 38 बिबवेवाडीमधील अण्णाभाऊ साठे नगर येथे आगीची दुर्घटना घडली. यामध्ये सहा ते सात कुटुंबांची घरे जळून खाक झाली. या ठिकाणी तत्परतेने माजी महापौर, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी भेट दिली.

दुर्घटनेतील बाधित कुटुंबांना आधार व धीर दिला. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त मोळक, कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त घोरपडे व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुणे शहराच्या तहसीलदार कोलते यांना दुर्घटनेतील बाधितांचे तलाठी यांच्या माध्यमातून त्वरीत पंचनामे करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहिते, समीर बांगी, जितू चव्हाण तसेच या भागातील कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीमुळे व प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

HB_POST_END_FTR-A2

.