Pune : मारीगोल्ड आयटी पार्कला आग, नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज –  पुण्यातील कल्याणीनगर य़ेथील (Pune)  मारीगोल्ड आयटी पार्क येथे आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास आग लागली आहे.घटनेची वर्दी मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी पोहचले असून तेथील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.

 

Pune : शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

या बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झालेली आहेत. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका केली असून, अजून काही नागरिक अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत (Pune) आहे.

 

या आधी ही 9 मे रोजी पुण्यातील विमाननगर परिसरातील एका आयटी बिझनेस हबमध्ये अशीच आग लागली होती मात्र सुदैवाने दोन्ही दुर्घटनांमध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.