Pune News : भेकराई नगर येथे बंद फ्लॅटला आग

एमपीसी न्यूज – पुण्यातील भेकराई नगर येथे पीएमटी (Pune News) बस स्टॉप डेपो च्या बाजूला रोहित रेसिडेन्सी येथे  पाचव्या मजल्यावरील बंद फ्लॅट ला आज(सोमवारी) सकाळी दहा वाजता आग लागली.

नागरिकांनी फ्लॅटमधून धूर येत असल्याची माहिती मध्यवर्ती अग्निशमन केंद्राला दिली. यावेळी जवान घटनास्थळी पोहचले असता पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. दलाच्या मदतीने फ्लॅटमध्ये प्रवेश करून घरातील खिडक्यांच्या काचा फोडून व्हेंटिलेशन करून सदरची आग पूर्ण विझवली.

Pakistan : पाकिस्तानमध्ये मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; 32 जण ठार

या आगीमध्ये बेडरूम मधील सर्व वस्तू कपाटातील सर्व कपडे व महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत. तसेच किचन मधील सर्व गृहपयोगी वस्तू खराब झालेल्या आहेत. (Pune News) तसेच फ्लॅट मधील वायरींग फ्रिज सिलिंग इत्यादी जळाले आहे.

या कामगिरीमध्ये तांडेल तानाजी आंबेकर, ड्रायव्हर राजू शेख, फायरमन संदिप जगताप, राजू टिळेकर, मदतनीस कराडे गाडगे कारंडे यांनी अथक प्रयत्न करून सदरची आग विझवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.