Kalepadal : शॉर्टसर्कीटमुळे काळेपडळ येथे फ्लॅटमध्ये आग

एमपीसी न्यूज – काळेपडळ (Kalepadal) येथील कोहिनूर आयरिश पार्क येथे पाचव्या मजल्यावर एका सदनिकेमध्ये आग लागली होती. ही घटना शुक्रवारी (दि.11) रात्री सव्वा अकरा वाजता घडली. यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.आगीची वर्दी मिळल्यानंतर हडपसर अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाचव्या मजल्यावर जात पाहणी केली. इमारतीमधील रहिवाशांनी तेथील स्थायी अग्निशमन यंत्रणेचा अत्यंत उत्तम वापर करीत आगीवर पाणी मारत आग आटोक्यात आणली होती. दलाकडून तिथे पाण्याचा वापर करत कुलिंगचे काम करीत आग पुर्ण विझवली.

Wadaki Fire : वडकी येथे चप्पल व बूटचे गोडाऊन जळून खाक

सदर आगीमधे दोन लॅपटॉप, प्रिंटर, टिव्ही व इतर काही साहित्य जळून (Kalepadal) नुकसान झाले होते. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागली असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. या कामगिरीत हडपसर अग्निशमन केंद्राचे स्टेशन ड्युटी ऑफिसर प्रमोद सोनावणे व वाहनचालक जगताप आणि जवान बाबा चव्हाण, चंद्रकांत नवले यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.