Pune News : लोहियानगरमध्ये भल्या पहाटे भीषण आग, नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

एमपीसी न्यूजपुण्यातील लोहिया नगर परिसरात जुन्या वॉशिंग मशीनला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पंधरा ते वीस जुने वॉशिंग मशीन, टेम्पो, रिक्षा, हातगाडी आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान या आगीचा भडका जवळच असलेल्या घरापर्यंत पोहोचला होता. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला

लोहिया नगर परिसरातील मनपा कॉलनी जवळ एक मोकळी जागा आहे. या जागेत जुने वॉशिंग मशीन ठेवण्यात आले होते. या वॉशिंग मशीनला शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून याची माहिती दिली त्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा मारा करत काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवले.

आग लागलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच मानवी वसाहत आहे. जर ही आग आणखी पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.