Fire News : रात्रीच्या वेळी घरात आग; प्रसंगावधानामुळे चार जीव वाचले

निगडी, दापोडीत आगीच्या तीन घटना

एमपीसी न्यूज – निगडी येथील सेक्टर क्रमांक 22 येथे फातिमा मशीदजवळ मध्यरात्रीच्या वेळी आग लागली. घरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत बाहेर पळ काढल्याने चार जणांचा जीव वाचला. ही घटना शुक्रवारी (दि. 19) पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. तसेच गुरुवारी रात्री दापोडीत एक आणि निगडी परिसरात आणखी एक आगीची घटना घडली आहे.

इम्तियाज शेख, त्यांची पत्नी, 15 वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी हे चार जणांचे कुटुंब निगडीतील फातिमा मशिदीजवळ राहतात. गुरुवारी रात्री हे कुटुंब घरात झोपी गेले. पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास शेख यांच्या पत्नीला झोपेतून जाग आली. किचनचा दरवाजा बंद होता. किचनमध्ये जाण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला असता किचनमधून आगीचे लोट त्यांच्या अंगावर आले.

_MPC_DIR_MPU_II

शेख यांच्या पत्नीने तात्काळ शेख आणि त्यांच्या दोन्ही मुलांना उठवले आणि घराबाहेर काढले. दरम्यान आग पसरली होती. आगीमध्ये घरातील इलेक्ट्रिक वायरिंग जळाली. त्याचा विद्युत प्रवाह घरात पसरल्याने शेख यांनी घराचा विद्युत पुरवठा बंद केला. स्थानिक नागरिकांनी अग्निशनम विभागाला घटनेची माहिती दिली.

प्राधिकरण अग्निशमन उपविभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यमुनानगर पोलीस चौकीजवळ गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास एका घरात आग लागली. त्या घटनेत देखील घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राधिकरण उपविभागाचे जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दापोडी येथे देखील गुरुवारी रात्री आगीची घटना घडली. एकाच रात्रीत तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like