Pune : राजयोग साडी सेंटर आग घटना प्रकरणी दोघांना अटक

आणखी एकाचा शोध सुरू

एमपीसी न्यूज – देवाची उरळी येथील राजयोग साडी सेंटरला लागलेल्या आग प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एकजण अद्याप फरार आहे.

सुशील बजाज आणि सुरेश जाकड, अशी या अटक आरोपींची नावे आहेत.  तर भवरलाल प्रजापती याचा अद्याप शोध सुरू आहे.  ही घटना आज (गुरुवार) पहाटे घडली होती.

या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. सुशील आणि सुरेश यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवाची उरळी येथील राजयोग सेंटर हे सुशील बजाज, सुरेश जाकड आणि भवरलाल प्रजापती हे तिघे मिळून भागीदारीत हे दुकान चालवत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.