Fire Service Week : आगीच्या घटना टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी…

एमपीसी न्यूज – देशभर 14 ते 20 एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अग्निशमन दल सप्ताह साजरा केला(Fire Service Week) जात आहे. या कालावधीत अग्निशमन विभागाकडून नागरिकांना आग प्रतिबंधक उपाययोजना सांगितल्या जातात. नागरिकांनी देखील आगीच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घेणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाकडून अग्नी व जीव सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात आली आहे –

इलेक्ट्रिकल उपकरणे हाताळताना विशेष सुरक्षितता बाळगा. ओल्या हाताने (Fire Service Week)इलेक्ट्रिकल उपकरणे हाताळणे टाळा तसेच इलेक्ट्रिकल उपकरणांचा वापर करून झाल्यानंतर ती उपकरणे काळजीपूर्वक बंद करा.

स्वयंपाक करताना सैल कपडे परिधान करू नयेत तथा कपडे आगीच्या संपर्कात येणार नाहीत व कोणत्याही कारणास्तव आग लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

नवीन LPG सिलेंडर टाकी जोडताना गॅस गळती होत नाही खात्री करावी.

LPG सिलेंडर टाकी जमीन पातळीवर ठेवा.

LPG सिलेंडर व रेग्युलेटर दरम्यानची सुरक्षा नळी विहित मुदतीत (दर 5 वर्षानंतर) बदली करावी तथा काही अन्य कारणास्तव खाराब झाली असल्यास 5 वर्षाची मुदत न पाहता त्वरीत बदलावी.

काडीपेटी (माचीस) व गॅस लाइटर लहान मुलांच्या हातास सहजपणे पोहचणार नाही अशा रीतीने सुरक्षितपणे ठेवा, तसेच त्यांचा वापर न करण्याबाबत आवश्यक सूचना द्या.

आग लागली तर गोंधळून जाऊ नका, अग्रिशमन उपकरणांचा उपयोग करून आग विझविण्याचा प्रयत करा.

आग विझविणे शक्य नसल्यास आगी बाबत इतरांना सावध करून इमारतीबाहेर सुरक्षित स्थळी पोहचा आणि आग विझवण्यासाठी मदतीकरिता आवाज द्या. अग्रिशमन पथकास घटनास्थळी बोलावून घ्या.

नजीकच्या अग्रिशमन पथकास घटनास्थळी पाचारण करण्यासाठी अग्निशमन नियंत्रण कक्षास दुर्घटनेसंबंधित आवश्यक किमान पूरक माहिती द्यावी. जसेकी, स्वताःचे संपूर्ण नाव, स्वतःचा मोबाईल क्रमांक, दुर्घटना स्थळाचा संपूर्ण पत्ता. नजीकचे सर्वपरिचित शासकीय कार्यालय, हॉस्पिटल इत्यादी त्याचप्रमाणे आग लागलेल्या स्थळाचे, मालाचे, वस्तूचे, आग लागलेल्या इमारतीचा मजला क्रमांक, इमारतीचे एकूण मजले, ईमारती मध्ये कोणी व्यक्ती अडकले आहेत का आदी.

अग्रि सुरक्षितते संबंधित सतत दक्ष व सतर्क राहा. संभाव्य आगीच्या प्रसंगास सामोरे जात असताना लहान मुले, गरोदर महिला, आजारी रुग्ण, वयोवृद्ध व्यक्ती यांना प्राधान्याने संधी व आवश्यक मदत देवून बचाव कार्य करण्याचा प्रयन करा.

आग लागली असता धुरापासून वाचण्यासाठी खाली वाकून, श्वास घेताना नाका तोंडा द्वारे धूर शरीरात जावू नये या करिता ओला रुमाल पकडून स्वच्छ श्वास घेत त्वरेने रांगत इमारतीबाहेर सुरक्षित जागी पोहचा.

संभाव्य आगीत तुमचे कपडे पेटले असल्यास सैरावैरा धावू नका, खाली जमिनीवर आडवे पडून आणि लोळून आगीच्या ज्वाळा विझविण्याचा प्रयत्न करा.

संभाव्य आगीच्या प्रसंगी इमारती मधील लिफ्ट (उद्वाहन) चा उपयोग करू नका. इमारती मधील सुरक्षित बचाव कार्य करणेकामी/ इमारतीच्या तळ मजल्यावर पोहचणे कामी अग्रिसुरक्षित जिन्याचा (Fire Staircase) वापर करा.

आगीमुळे भाजल्यावर प्रथमोपचार करा तथा भाजलेल्या जागी स्वच्छ व नळाचे थंड (प्रेशर नसलेले) पाणी प्रवाहित करा. प्रथमोपचारा नंतर सदर जखमी इसमास आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय उपचारा करिता वैद्यकीय मदत घ्या.

आपल्या मिळकती मध्ये अग्निसुरक्षा उपकरणे बसवा व कायम स्वरूपी कार्यान्वित असल्याची खातरजमा करा.

दूरध्वनी क्रमांक 101 डायल करून आगी बाबतची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास त्वरित द्या. आपल्या जवळच्या सर्व अग्रिशमन पथकाचे संपर्क क्रमांक आपापल्या मोबाईल मध्ये जतन (Save) करून ठेवा. सदर क्रमांक आपल्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांच्या केबिन/खोलीत/कार्यालयात सर्वांच्या नजरेस सहजपणे दिसतील अशा प्रकारे फलकावर नोंदवावेत.

इमारतीच्या फायर स्टेअरकेस मध्ये, रिफ्यूज एरियामध्ये अडगळीचे अनावश्यक ज्वलनशील साहित्य जमा करून ठेवू नका. तसेच अन्य बिगर निवासी इमारतीचे निकास मार्ग देखी कायमस्वरूपी सुरक्षित व बचाव कार्यासाठी उपलब्ध खरोखरच आहेत कि नाही या बाबत खातरजमा करा.

इमारतीच्या टेरेसवर तथा बेसमेंट मध्ये कोणत्याही प्रकारच्या  ज्वलनशील साहित्याचा साठा करण्यात येत नसल्याची खातरजमा करा.

निवासी व बिगर निवासी इमारतीच्या सभोवताली कुठेही इलेक्ट्रिकल डी.पी. इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉरमर, इलेक्ट्रिकाल ओपन वायर्स यांच्या पासून विशेषतः पावसाळ्यात शॉर्ट सर्किटचा धोका संभवणार नाही याची खातरजमा करून आवश्यक उपयायोजना करा.

निवासी व बिगर निवासी मिळकतीमध्ये अनुज्ञेय करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा अधिक ज्वलनशील पदार्थांचा, वस्तूंचा साठा करू नका.

आपल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पावसाळ्यात पाणी भरणार नाही अथवा पाणी भरल्यास सदरील पाणी बेसमेंट मधून बाहेर काढण्यासाठी आवश्यक क्षमतेचे डि-वॉटरींग सबमर्सिबल पंप बसविले आहेत कि नाही, बसविलेल्या पंपाची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल केली असून ते कार्यान्वित आहेत कि नाही याबाबत खातरजमा करून आवश्यक उपाययोजना करा.

आपल्या इमारती मधील बसविणे आलेल्या लिफ्टची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल केली आहे कि नाही, लिफ्ट मध्ये संबंधित दुरुस्ती व देखभाल करणा-या संस्थेचा/ विद्युत ठेकेदाराचा/टेक्निशियन चा आपात्कालीन मदतीकरिता मुख्य व पर्यायी संपर्क क्रमांकाचा फलक लावण्यात यावा.

National Fire Service Day : व्हिक्टोरिया बंदरात महाकाय जहाजाला आग अन 700 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू; जाणून घ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन का पाळला जातो

आपल्या इमारतीच्या अग्नि प्रतिबंधक उपाययोजना महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त फायर लायसन्स एजन्सी मार्फत वेळोवेळी प्रत्येक सहामाही (1 जानेवारी ते 30 जून आणि 1 जुलै ते 31 डिसेंबर) कालावधीमध्ये दुरुस्ती व देखभाल करून त्याबाबतचे ‘फॉर्म बी’ प्राप्त करून त्याची एक प्रत नजीकच्या मुख्य अग्निशमन केंद्रात जमा करण्यात यावी.

आपल्या इमारती मध्ये प्रत्येक सहा महिन्यातून किमान एकदा तरी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त फायर लायसन्स एजन्सीच्या सहकार्याने मॉकड्रिलचे आयोजन करा. आवश्यकतेनुसार नजीकच्या अग्निशमन केंद्राची, पोलीस स्टेशन, महावितरण विद्युत कंपनीचे अभियंता तांत्रिक प्रतिनिधी, लिफ्ट टेक्निशियन्स, रुग्णालय/रुग्णवाहिका व अन्य आपात्कालीन सेवा पुरविणा-या सर्वांच्या मार्फत आवश्यक मदत घ्या.

आपला परिसर अग्नि सुरक्षित ठेवण्यासाठी नजिकच्या अग्रिशमन केंद्रास भेट द्या व मोफत अग्रि प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती मिळवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.