BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : मावळ भाजयुमोचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या संपर्क कार्यालयाला आग

एमआयडीसीचे बंब घटनास्थळी दाखल

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांच्या तळेगाव स्टेशन येथील समर्थ छाया इमारतीतील संपर्क कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे आज शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली.

दरम्यान, माहिती मिळताच एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असून आग विझविण्याचे काम जवळपास दीड तास सुरु होते. रात्री साडेआठच्या सुमारास आग आटोक्यात आली. रवींद्र भेगडे यांचे संपर्क कार्यालय आणि आतील साहित्यासह कागदपत्रेे आगीत जळून खाक झाले. बॅॅॅटरी शाॅर्टसर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली आहे. सुदैवाने आगीत कुुुुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठया प्रमाणावर झाली आहे.

HB_POST_END_FTR-A4

.