Wakad : इस्त्री करताना शॉर्टसर्किट झाल्याने फ्लॅटला आग

एमपीसी न्यूज – इस्त्री करत असताना अचानक इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. यामध्ये फ्लॅटमधील सर्व साहित्य जळाले. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी दीड वाजता वाकड येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे उरो शाळेजवळ असलेल्या पलाश सोसायटीमध्ये सातव्या मजल्यावर गोविंद कलाटे यांच्या फ्लॅटमध्ये आग लागली. दुपारी दीड वाजता घरामध्ये एक महिला कपड्यांना इस्त्री करत होती. अचानक इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाले आणि फ्लॅटमध्ये आग लागली. काही क्षणात आग संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरली. घरातील टीव्ही, कपडे, फर्निचर आणि अन्य सर्व साहित्य आगीत जळाले. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली असता रहाटणी अग्निशमन उपविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याने त्याचा देखील उपयोग जवानांना आग तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.