Chinchwad : लाकडाच्या वखारीला आग

एमपीसी न्यूज – लाकडाच्या वखारीला आग लागली. यामध्ये वखारीमधील लाकडी माल जळून गेला. ही घटना गुरुवारी (दि. 5) सकाळी पावणेआठच्या सुमारास डी ब्लॉक, चिंचवड येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील डी ब्लॉक येथे अर्जुन शिवाजी पटेल यांची लाकडाची वखार आहे. गुरुवारी सकाळी वखारीला अचानक आग लागली. आग अचानक भडकून संपूर्ण वखारीत पसरली. दरम्यान, वखार मालक अर्जुन पटेल यांनी अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशमन उपविभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

वरिष्ठ फायरमन सारंग मंगरूळकर, परशुराम ईसवे, फायरमन अंकुश बडे, प्रशिक्षणार्थी विजय इंगळे यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. वखारीमधील लाकडी स्क्रॅप माल जळाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.