BNR-HDR-TOP-Mobile

Pune : विसर्जनावेळी पाण्यात बुडालेल्या आठ जणांना वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडालेल्या आठ जणांचे प्राण वाचविण्यात  अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. 

आज गणपती विसर्जना दरम्यान वृद्धेश्वर घाटाजवळ एक युवक बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे व जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर, चौगुले यांनी बुडणाऱ्या युवकास वाचविले.

आज सायंकाळी सहा वाजता गणपती विसर्जनावेळी अमृतेश्वर विसर्जन घाटावर बोट पलटी झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे व जीवरक्षकांनी बोटीतील 3 पुरुषांचे जीव वाचविले.

औंध विसर्जन घाटावर विसर्जनादरम्यान पाय घसरल्याने 14 वर्षीय मुलगी पाण्यात बुडाली असताना प्रभारी अग्निशमन अधिकारी कमलेश सनगाळे तर तिथेच एका 54 वर्षीय इसमाला बुडताना चंद्रकांत बुरुड यांनी वाचविले. सलग घडणाऱ्या या घटनांमधे अग्निशमन दलाने 8 जणांना जीवदानच दिले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3