Nigdi : निगडीत ‘रावण गँगचे’ फायरिंग, एक जखमी

परिसरातील वर्चस्ववादातून एका सराईत गुन्हेगाराचा दुसऱ्या गुन्हेगारावर गोळीबार

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी, ओटास्कीम येथे परिसरात वर्चस्व ठेवण्याच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने दुसऱ्या सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला यामध्ये एक जखमी झाला आहे. एकाला दगडाने मारहाण करण्यात आलेली आहे.

आकाश दौडमनी (30, रा. ओतास्कीम, निगडी) याच्यावर गोळीबार करण्यात आलेला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे. तर आकाशचा भाऊ रवी याला दगडाने आणि दांडक्याने मारहाण करुन जखमी लेले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; दोडमने आणि खवले यांच्यात परिसरातील वर्चस्ववादातून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. बुधवारी रात्री ते दोघे एकमेकांच्या समोर आले. त्याच्यात रात्री भांडण झाले. याच वादातून बुधवारी रात्री सव्वा आकराच्या सुमारास ओतास्कीम बिल्डींग 3 व 4 समोर हा प्रकार घडला.

किरण खवले हा त्याचे सहा, सात साथीदार हत्यारे घेऊन तेथे आला. यावेळी झालेल्या वादातून आकाश याच्या पायावर गोळीबार करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यातील संशयित चार जणांना ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.