Yerawada- वकीलावर अज्ञाताकडून गोळीबार

एमपीसी न्यूज – पुण्यातील येरवडा येथे वकिलावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना आज सोमवारी(दि 22) रात्री घडली. या गोळीबारात अॅड. देवानंद ढोकणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोरेगावमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. देवानंद ढोकणे हे रात्री काम संपवून कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते.रात्री पावणे नऊच्या सुमारास संगमवाडी येथे दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली व हल्लेखोर पसार झाले. या गोळीबारात जखमी झालेल्या ढोकणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोळीबारात ढोकणे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून याप्रकरणी पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.