Nigdi News : पिंपरी – चिंचवड शहरातील पहिल्या बालस्नेही पोलीस कक्षाचे उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या बालस्नेही पोलीस कक्षाचे उद्घाटन निगडी पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवारी (दि. 15) करण्यात आले. बालकांच्या संदर्भातील सर्व प्रकारचे गुन्हे आणि पोलीस ठाण्यातील प्रक्रिया बालस्नेही पद्धतीने करण्यासाठी तसेच पोलीस ठाण्याच्या कोणत्याही कार्य पद्धतीचा बालकांवर दबाव येऊ नये यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

याप्रसंगी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस डॉ. आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, शंकर आवताडे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका शर्मिला बाबर, अतुल शितोळे, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनचे कॅरोलिन ओज्वा द वॉल्टर, बी जी शिर्के कंपनीचे श्री लमाण, श्री चव्हाण आदी उपस्थित होते.

बालकांचे हक्क आणि त्यांच्या समस्यांबाबत काम करण्यासाठी या अनोख्या बालस्नेही पोलीस कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे वातावरण बालस्नेही करणे, भरकटलेल्या बालकांवर चांगले संस्कार करण्यासाठी हा कक्ष प्रयत्न करणार आहे. पुढील काळात दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातही असे बालस्नेही पोलीस कक्ष तयार केले जाणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये निवड झाल्याबद्दल पोलीस कर्मचारी परवीन पठाण यांचा कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सागर कवडे यांनी केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.