Pune- फस्ट फ्लाईट कंपनीच्या डायरेक्टरने केल 2 कोटी भविष्य निर्वाह निधीचा अपहार

एमपीसी न्यूज – फस्ट फ्लाईट कुरिअर कंपनीच्या डायरेक्टरने कर्मचा-यांचा तब्बल 1कोटी 89 लाख 19 हजार 616 रूपयांचा भविष्य निर्वाह निधीचा अपहार करून कर्मचा-यांचा विश्वासघात केला आहे. ही घटना मार्केटयार्ड येथील फस्ट फ्लाईट कुरिअर कंपनीमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील फस्ट फ्लाईट कुरिअर कंपनीच्या डायरेक्टरने जवळपास 600 कर्मचा-यांच्या जुन 2017 ते 2018 मधील पगारातून 74 लाख 68 हजार 880 रोख रक्कम कपात केली. ती रक्कम कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात भरणे गरजेचे असताना त्यात न भरता तब्बल 1कोटी 89 लाख 19 हजार 616 रूपयांचा अपहार करून कर्मचा-यांचा विश्वासघात केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.