_MPC_DIR_MPU_III

First look of Kangana’s Tejas : ‘तेजस’मध्ये कंगना साकारणार फायटर पायलटची भूमिका

सर्वेश मेवारा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विकी कौशलच्या प्रसिद्ध ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचे निर्माते कंगनाच्या ‘तेजस’ची निर्मिती करत आहेत.

एमपीसी न्यूज – बॉलिवूडमधील तथाकथित घराणेशाहीला टक्कर देणारी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडची ‘क्वीन’कंगना राणावतला ओळखले जाते. विविध चित्रपटांमधील आपल्या समर्थ अभिनयाने कंगनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. कंगनाच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. ‘तेजस’या युद्धपटात कंगना भारतीय वायुदलातील पायलटची भूमिका साकारणार आहे. सर्वेश मेवारा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विकी कौशलच्या प्रसिद्ध ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचे निर्माते कंगनाच्या ‘तेजस’ची निर्मिती करत आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

‘तेजस या चित्रपटात मी एअर फोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे. देशाच्या साहसी एअरफोर्स पायलटची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असून मी या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला अभिमान आहे’, असं म्हणत कंगनाने या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्ट केला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘पंगा’च्या प्रमोशनवेळी कंगनाने ‘तेजस’ चित्रपटाबाबत खुलासा केला होता. त्याचप्रमाणे तिने दिलेल्या काही मुखाखतीत तिची बालपणापासूनची एअरफोर्समध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कंगनाने या चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग देखील घेतलं आहे. प्रोफेशनल ट्रेनरच्या हाताखाली कंगनाने एअरफोर्स पायलटच्या भूमिकेचे धडे गिरवले आहेत. ‘तेजस’च्या फर्स्ट लुकनंतर आता तिच्या चाहत्यांना ट्रेलरची प्रतीक्षा आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.