Pune : ‘हायराइज कमिटी’ची पहिली बैठक सोमवारी

एमपीसी न्यूज – शहरात ७० मीटरहून अधिक उंचीच्या इमारतींच्या बांधकाम प्रस्तावांची छाननी करण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय ‘हायराइज कमिटी’ नेमण्यात अली आहे. या समितीची पहिली बैठक सोमवारी होणार आहे.

पालिकेच्या सुधारित विकास आराखड्यानुसार ३६ मीटर ते शंभर मीटर उंचीच्या हायराइज इमारतींना बांधकाम परवानगी देण्यात येते. हायराइज इमारतींसाठी बांधकाम प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याच्या छाननीसाठी ही समिती नेमण्यात अली आहे. ‘हायराइज कमिटी’ हायराइज इमारतींच्या बांधकामांची शक्यता पडताळून महापालिका आयुक्तांना सल्ला देण्याचे काम करणार आहे.

या समितीची पहिली बैठक सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी ५ वाजता विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यानाच्या अध्यक्षते खाली होणार आहे. या नंतर ह्या समितीची बैठक दर दोन महिन्यांनी घेण्यात येणार आहे. याबाबाचे प्रस्ताव असल्यास शहर अभियंता, सदस्य सचिव, यांचे सादर करावेत असे आवाहन विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.