Chikhali : स्टुडंट्स एज्युकेशन सोसायटीचा पुरस्कार सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – स्टुडंट्स एज्युकेशन सोसायटीतर्फे दिला जाणारा आदर्श समाजसेवा पुरस्कार समाजसेवक आबासाहेब वाघमारे यांना तर आदर्श महिला प्रबंधक पुरस्कार सिंडिकेट बँकेच्या प्रथम महिला व्यवस्थापक सुनंदा दामसे यांना प्रदान करण्यात आला.

चिखली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष विजय सोनावणे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका योगिता नागरगोजे, समाज नेवाळे, केशव घोळवे, समुपदेशक वैदेही जंजाळे, लक्ष्मण दामसे आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांना देखील मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सत्कारमूर्ती दामसे तसेच दत्ता साने यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समुपदेशक वैदेही जंजाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पवार यांनी केले. आभार चेतना सोनावणे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.