Women Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी ठरली महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सांगली येथे ही स्पर्धा पार पडली असून (Women Maharashtra Kesari) या स्पर्धेत प्रतीक्षा बागडी  हिने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रतीक्षा बागडी  हिने वैष्णवी पाटील  हिला चितपट केले. तिला चांदीची मानाची गदा सुपूर्द करण्यात आली.

 

पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील होतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद याच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. हलगीच्या निनादात मैदानातून चांदीच्या गदाची फेरी काढण्यात आली .

Pavana Bank Election : पवना बँकेच्या निवडणुकीतून आठ जणांची माघार

 

या स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात पारपडली. कधीकाळी दोघी एकाच रूममध्ये राहत होत्या. (Women Maharashtra Kesari) तेव्हा मैत्रिणींमधील या लढतीची उत्सुकता सर्वांमध्ये होती अखेर प्रतीक्षा बागडी  वैष्णवी पाटीलला चितपट करून ही स्पर्धा जिंकली.

 

सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात या पहिल्यावहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघातर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत पार पडल्या. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास 400 हून अधिक महिला कुस्तीगिर दाखल झाल्या होत्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.