Wakad Crime News : दुकानदाराला मारहाण करत टाकला दरोडा; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून मारहाण करून जखमी करत रोकड व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन दुकानातील मालाचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करून वाकड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 11) रात्री सव्वाआठच्या सुमारास वाकड येथे घडली.

पिराजी धोंडीबा खंकरे, चंदन पवार, विशाल हाराळ व त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रतिक ज्ञानेश्वर सकपाळ (वय 25, रा. वाकड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 12) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी काम करीत असलेल्या दुकानात जाऊन फिर्यादीला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी दुकानाचे मालक कमलेश बालघरे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना हाताने मारहाण करून दमदाटी करून त्यांच्या कानशिलात भडकावली.

त्यानंतर दुकानातील बॅटरी, सिमेंटच्या गट्टूने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीकडील दोन हजार रुपयांची रोकड व मोबाईल सुद्धा आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला तसेच दुकानातील मालाचे नुकसान देखील केले. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.