Chakan News : चाकण मधील खून प्रकरणी पाच जणांना अटक, दोन अल्पवयीन ताब्यात

एमपीसी न्यूज : चाकण मधील तरुणांच्या खून प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बुधवारी (दि. 8 सप्टेंबर ) अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.  मुलीची छेड काढल्यानंतर चिडलेल्या तरुणांनी हा खून केल्याची बाब तपासात समोर आली आहे.

रोहित प्रभू सहानी ( वय 16, रा.चाकण ) असे सोमवारी ( दि. 6 सप्टेंबर ) दुपारी एकच्या सुमारास  खून झालेल्या तरुणाचे नाव असून या बाबत त्याच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी सुरुवातीला हुजेफा असिफ काकर यास अटक केली होती. त्यानंतर निहाल सलीम इनामदार, मन्सूर नसरुद्दिन इनामदार, सोहेल राजू इनामदार यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने अराफत वाजिब सिकीलकर व दोन अल्पवयीन मुलांना . (सर्व जण रा.चाकण ) ताब्यात घेतले आहे.

मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून वरील सर्वांनी मिळून रोहित सहानी याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला लाथा बुक्क्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून व डोक्यात दगड घालून खून केला होता.  ही घटना सोमवारी ( दि. 6 सप्टेंबर ) दुपारी एकच्या सुमारास चाकण मध्ये घडली होती.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.