Sangvi : गॅरेजबाहेर पार्क केलेल्या पाच दुचाकी जाळल्या; तरुणास अटक

एमपीसी न्यूज – गॅरेजच्या बाहेर उभ्या केलेल्या पाच दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्या. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 23) पहाटे पिंपळे निलख येथे घडली.

कृष्णा रमेश सोरटे (वय 20, रा. ढोरे भुवन, जुनी सांगवी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू इरप्पा तेलंगी (वय 36, रा. राजाराम नगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेलंगी यांचे पिंपळे निलख येथील इंगोले चौकात शिवशंभो नावाचे गॅरेज आहे. रविवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास आरोपी सोरटे याने गॅरेजबाहेर उभ्या असलेल्या पाच दुचाकींवर पेट्रोल टाकून त्या पेटवून दिल्या. यामुळे लागलेल्या आगीत 51 हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.