Nigdi Crime News : पाच तोळ्याची सोन्याची चेन आणि दोन बीएचके फ्लॅटची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पाच तोळे सोन्याची चेन आणि दोन बीएचके फ्लॅट माहेरहून आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला तसेच पती नपुंसक असल्याचे माहिती असताना विवाहितेपासून लपवून ठेऊन तिची फसवणूक केली. हा प्रकार 19 जून 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत धायरी पुणे येथे घडली.

याप्रकरणी पीडित विवाहितेने माहेरी आल्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी पती (वय 29), सासरे (वय 61), सासू (वय 55), नणंद (वय 25), चुलत सासू (वय 30, सर्व रा. धायरी, पुणे) यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला तिच्या वडिलांकडून पाच तोळ्याची सोन्याची चेन व ब्रेसलेट आणि दोन बीएचके फ्लॅट घेऊन देण्यास सांगण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने आरोपींना नकार दिला. त्यावरून आरोपींनी विवाहितेला मारहाण, शिवीगाळ केली. विवाहितेच्या वडिलांना शिवीगाळ केली.

त्यानंतर फिर्यादी माहेरी जाताना त्यांच्या अंगावर धावून जात सगळ्यांना संपवून टाकीन अशी आरोपींनी धमकी दिली. विवाहितेचा आरोपी पती नपुंसक असल्याचे आरोपींना माहिती असूनही ही माहिती विवाहितेपासून लपवून ठेवत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.