Hinjawadi Crime News : बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यवसायिकाच्या जागेवर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे शनिवारी (दि. 11) सकाळी घडली.

शुभम कैलास भुंडे (वय 23), अजित दगडे आणि तीन महिला, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दीपक प्रकाश बोर्डे (वय 35, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी सोमवारी (दि. 13) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोर्डे यांची ‘साई प्रेम डेव्हलपर्स’ नावाची कंपनी आहे. या कंपनीची बावधन येथील स्टारगेज सोसायटीलगत जागा आहे. दरम्यान, या जागेत काम सुरू असताना शनिवारी सकाळी आरोपी तिथे आले. तीन महिला आरोपींनी धमकावत फिर्यादी यांच्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश करून पत्रा शेड उभारले, शिवाय मोजणी करणाऱ्या मनोज सुतार आणि गायकवाड यांना धमकी दिली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.