Pune : मौजमजेसाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांना अटक

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी महागड्या गाड्या चोरणाऱ्या सहा महाविद्यालयीन तरुणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या 22 लाख रुपये किमतीच्या 18 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

आदेश उर्फ विनायक रामचंद्र शिंदे (19), आशिष सुनील सरदार (20), माधव कृष्णा गोपाल प्रसाद सिंह (19), सोहेल गुलाब शेख (19), किरण खैरनार आणि सोमनाथ प्रकाश पाटोळे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्व पुण्यातील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी लोहगाव परिसरात गस्त घालत असताना आरोपी सोहेल शेख हा केटीएम दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो चालवत असलेली दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता मित्रांच्या मदतीने त्याने पुणे शहरात अनेक ठिकाणी चोरी केल्याचे कबुल केले. चोरलेल्या गाड्या विकून मिळालेल्या पैशातून आरोपी मौजमजा करत असल्याचे आरोपींनी सांगितले.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 4 बुलेट, 4 केटीएम, 3 पल्सर, 1 करिझमा, युनिकॉर्न, ऍक्टिव्हा, ज्युपिटर असा तब्बल 18 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.