Bhosari : विद्यार्थी उभारणार गडकिल्ल्यांच्या पाचशे प्रतिकृती

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरूपीठ सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने किल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच युवा महोत्सव ही भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे 5 जानेवारी रोजी होणार आहे.

बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये मुलांमध्ये असणारी व्यसनाधिनता, अंधश्रद्धा यावर वैचारिक मंथन करून वैज्ञानिक दृष्टीकोन दिला जातो. तसेच पर्यावरण रक्षण व सामाजिक जबाबदारी याबाबत जागरुक केले जाते. विभागाच्या वतीने यंदा किल्ले बनवा व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या उपक्रमातून सेवा केंद्रातील बालसंस्कार वर्गाच्या सर्व शाखा व काही शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून एकाच वेळी पाचशे मातीचे गड-किल्ले साकारण्यात येणार आहेत. या उपक्रमात जे किल्ले साकारले जाणार आहेत, त्यांची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती दर्शविणारे फलक लावण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे.

विद्यार्थी व युवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार रुजविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवामध्ये बालसंस्कार विभागप्रमुख नितीन मोरे हे प्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1