Chakan News : शहर परिसरात चोरीच्या पाच घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील चाकण, हिंजवडी, भोसरी, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या पाच घटना उघडकीस आल्या. या पाच घटनांमध्ये चोरट्यांनी एक लाख 64 हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 20) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राहुल मारुती गायकवाड (वय 30, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी बालाजी नगर येथून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री बारा ते सकाळी साडेसात वाजता च्या कालावधीत घडली.

चाकण पोलीस ठाण्यात चोरीचा आणखी एक गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये बालाजी राममूर्ती गोल्लापुडी (वय 32, रा. मुकाईनगर, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या मुलाला कडेवर घेऊन जात असताना अज्ञात चोरट्याने मुलाच्या गळ्यातील 52 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी  नकळत चोरून नेली. ही घटना 16 जानेवारी रोजी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे.

शिवाजी गोविंदराव वळसे पाटील (वय 60, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वळसे-पाटील हे पुना ट्रेलरवालाज ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये मॅनेजर पदावर काम करतात. अज्ञात चोरट्याने त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेत पार्क केलेल्या एका ट्रेलरचे 20 हजारांचे चार टायर चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 19) दुपारी दीड ते गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या कालावधीत ताथवडे येथे घडली.

सागर बापू जाधव (वय 34, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी गावातील मोहननगर येथे फिर्यादी यांचे गोडाऊन आहे.  फिर्यादी यांनी गोडाऊनच्या समोर क्लिनिंग करून उघड्यावर ठेवलेले जयश्री पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे 57 हजार रुपये किमतीचे 570 जॉब अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना तीन सप्टेंबर 2021 रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

रवी मनोहरलाल चंदननानी (वय 40, रा. पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या ईको कार गाडीचा वीस हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना सात जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते आठ जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.