Pimpri : विवाहितेकडे पाच लाख रुपये, पाच तोळे सोन्याची मागणी

एमपीसी न्यूज – सासरच्या लोकांनी विवाहितेकडे पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोने आणण्याची मागणी करत तिचा छळ केला. याबाबत विवाहितेने सासरच्यांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

सासू सुलोचना कैलास डोके, दीर जयेश कैलास डोके, पती विजय कैलास डोके (सर रा. रावेत) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर या कालावधीत आरोपींनी फिर्यादी महिलेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोन्याचे दागिने आणण्याची मागणी केली. यासाठी आरोपींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तर पती विजय याने वायरने व हाताने मारहाण केली. याप्रकरणी विवाहितेने गुन्हा नोंदवला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.