Chinchwad : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत पाच लाखाला गंडा

एमपीसी न्यूज – चिटफंडमध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत एकाला तब्बल पाच लाखाला गंडा घालण्यात आला. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथील अवधुत चिटफंडमध्ये घडला.

महेश मारूती तरस (वय 45, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्या चिटफंड चालकाचे नाव आहे. विजय सोमनाथ दाते (वय 40, रा. बळवंत कॉलनी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सन 2015 पासून घडला आहे.

आरोपी तरस याचे वाल्हेकरवाडीत अवधूत चिटफंड या नावाने कंपनी आहे. तरस याने दाते यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून चिटफंडमध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडले. त्यानुसार, दाते यांनी चिटफंडमध्ये वेळोवेळी पाच लाख रूपये भरले. मात्र, तरस यांनी त्यांना कोणताही परतावा न देता रकमेचा अपहार केला, असे पोलिसांनी सांगितले. चिंचवड ठाण्याचे फौजदार निकम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.