Pimpri : घर आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घर बांधण्यासाठी आणि नवीन गाडी घेण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती जोंगिरसिंग जेगिंसिंग बावरी, सासरे जेगिंसिंग किसनसिंग बावरी, दीर रवीसिंग बावरी, सासु चंद्रकोर बावरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी संगनमत करून फिर्यादी विवाहितेकडे घर बांधण्यासाठी आणि नवीन गाडी घेण्यासाठी वारंवार पैशांची मागणी केली. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.